ज्ञानदेव विश्वनाथ तळेकर यांचे निधन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम येथील ज्ञानदेव विश्वनाथ तळेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ७४ होते. ते केम येथील सामाजिक कार्यकर्ते बापुराव तळेकर यांचे वडिल होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
–