घोलपनगर येथून मोटारसायकलची चोरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता. ४ : करमाळा येथील घोलपनगर येथे लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार २९ एप्रिल ला दुपारी १ ते ४ यावेळेत घडला आहे, याची फिर्याद ३० एप्रिल २०२३ रोजी नोंदली आहे. यात शरद भरत जाधव (वय – ३४, रा. घोलपनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की २९ एप्रिल रोजी मी माझे सरकारी सेवा केंद्राचे कामकाज करताना माझी बजाज डिस्कव्हर कंपनीची मोटारसायकल घोलपनगर येथील वरद हॉस्पीटल समोर दुपारी १ वाजता लावली व माझे कामकाज संपल्यावर सायंकाळी चार वाजता माझी मोटारसायकल पाहिली असता, दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेतला परंतू ती सापडली नाही. ती चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हावलदार श्रीकांत हाराळे हे करत आहेत.
