चिखलठाण येथील ‘इरा पब्लिक स्कूल’चे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी घवघवीत यश संपादन केले. या प्रशालेतील 9 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील 6 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत.

इयत्ता 5 वी मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे खालील विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 1) सुहास भारत मुळीक 2) कन्हैय्या जोतिराम जाधव 3) यश ज्ञानदेव सरडे 4) समृद्धी दिगंबर शंकर 5) अमृता तुकाराम चोरगे 6) अक्षरा दादा पोरे या सर्व विद्यार्थ्याचे इरा पब्लिक स्कूलच्यावतीने हार्दिक अभिनंदन. संस्थेचे संस्थापक डॉ.ब्रिजेश बारकुंड, मुख्याध्यापक श्री.कसबे वर्गशिक्षिका कोठारी मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले, या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
