केम ग्रामपंचायत कर्मचारी अच्युत गुरव यांचे निधन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील विठ्ठल देवस्थानचे पुजारी व ग्रामपंचायत कर्मचारी अच्युत (उर्फ पिंकू) अशोक गुरव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ४० होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
कोरोना काळात विषाणूला रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करताना अच्युत यांनी आपला जीव धोक्यात घालून केम गावात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्याचे काम केले. या गोष्टीचे सर्वांनी मनापासून कौतुक केले. त्यांच्या इतरांना मदत करण्याच्या स्वभावाने ते प्रत्येक कुटुंबाला आपला सदस्य आहे असे येथील नागरिकांना वाटत होते. त्यांच्या निधनाने केम येथील समाजसेवक हरपला अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला गावांतील सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.