कमलादेवीच्या रस्त्यावरील दुकानासमोरील मोटारसायकलची चोरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : श्री कमलादेवीच्या रस्त्यालगत असलेल्या त्रिमुर्ती जेन्टस् पार्लर दुकानासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार ४ मे २०२३ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी विशाल नारायण खंडागळे (रा. फंडगल्ली, करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझे त्रिमुर्ती जेन्टस् पार्लर हे दुकान श्री कमलादेवीच्या रस्त्यावर असून ४ मे ला सायंकाळी मी माझे दुकान बंद करून माझी मोटारसायकल एमएच ४५ एसी २४२९ ही माझ्या दुकानासमोर लावली व माझे मित्र चंद्रकांत राखुंडे, सूरज बागडे, रणजित काळे यांचे सोबत चिवटे हॉटेलकडे चालत गेलो व परत आलो असता, माझ्या दुकानासमोरील माझी लावलेली हिरो कंपनीची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.
