चिखलठाण सोसायटीच्या संचालक मंडळाचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी लि चिखलठाण या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन विकास गलांडे, हेमंत दिनकर बारकुंड, संतोष पांडुरंग सरडे, सर्जेराव एकनाथ मारकड,रवींद्र ज्ञानदेव धोंडीराम गणपत आरकिले गोळे, मच्छिंद्र गणपत सरडे, सौ. मुक्ताबाई जालिंदर गव्हाणे, बबन नेमाने, राहुल बिभीषण, राजेंद्र बारकुंड व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

संस्थेचे कामकाज चांगले असून कर्जवसुली 100% असते तसेच 25 वर्षापासून या संस्थेवर राजेंद्र बारकुंड यांच्या वर्चस्वाखाली एकहाती सत्ता असून मा. संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कामकाज करणार असे राजेंद्र बारकुंड यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच कुर्डुवाडी कृषी उत्पन्न निवडणुकीमध्ये आ.बबनदादा शिंदे व आ. संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व राखल्याबद्दल करमाळा तालुक्याच्या व चिखलठाण गावच्या ग्रामस्थाच्यावतीने राजेंद्र बारकुंड यांनी आ.संजयमामा शिंदे यांचा सत्कार केला.