दहावीत सोलापूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहूमान मिळविलेल्या करमाळ्यातील शिवांजलीचा, जगताप विद्यालयाकडून सत्कार
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – शहरातील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली महेश राऊत हिने 99.40% गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान पटकावला आहे. सोलापूर जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा हा मान करमाळा तालुक्याला प्रथमच मिळाला आहे. शिवांजली च्या या यशाबद्दल तिचा सत्कारकर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाकडून शनिवारी (दि.३) करण्यात आला.
याच कार्यक्रमात कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेले इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील कौतुक सोहळा पार पडला. विद्यालयाचा एकूण निकाल 92.11 टक्के इतका लागला आहे. विद्यालयात प्रथम पाच क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे –
- प्रथम क्रमांक – कु राऊत शिवांजली महेश – 99.40%
- द्वितीय क्र. शिंदे पायल ज्योतिराम 95.00%
- तृतीय क्र. क्षिरसागर श्रावणी प्रकाश 94.80%
- पाचवा क्र. क्षिरसागर सानिका गणेश 93.80%
- चतुर्थ क्र. फंड सुचिता महादेव 94.60%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच समाजसेवा मित्र मंडळाचे सचिव व माजी मुख्याध्यापक गुलाबराव बागल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन प्रोत्साहित केले. प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.भागवत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षवृंद व पालक उपस्थित होते.