‘मकाई’ निवडणूक – 14 उमेदवारांनी केली मुंबई उच्चन्यायालयात रिट याचिका दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत छाननीत अवैध ठरलेल्या उमेदवारांच्या अपिलावर सुनावणी होऊन सर्व अपील फेटाळण्यात आल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्रकुमार दराडे यांनी दिला. यानंतर प्रा.रामदास झोळ यांनी आज (ता.५) मुंबई येथील उच्चन्यायालयात याबाबत रिट याचिका दाखल केली आहे. प्रा.झोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 14 उमेदवारांनी मुंबई येथे रिट याचिका दाखल केली आहे.
‘मकाई’च्या मागील संचालक मंडळातील उमेदवारांच्या मंजूर अर्जांवर प्रा.झोळ यांनी हरकती घेत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तथापि या सर्व हरकती उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यातच वांगी गटातून बागल विरोधी उमेदवार अमित केकान यांनी माघार घेतल्यामुळे बागल गटाचे पारडे वरचेवर जड होत आहे. शिवाय विरोधी गटाने दावा केलेले उमेदवार आपल्या बाजूने घेत निवडणूक बिनविरोध करण्याचा आटोकाट प्रयत्न बागल गटाकडून चालू असल्याचे दिसते आहे. या रिट याचिके सोबतच बागल गटाच्या वैध अर्जांवरील त्रुटीं विरोधात ‘इलेक्शन पिटीशन’ दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे प्रा. झोळ यांनी यावेळी सांगितले आहे.
या 14 उमेदवारांनी मुंबई येथील उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे…
पारेवाडी ऊस उत्पादक गटातून
१) रामदास मधुकर झोळ, २) माया रामदास झोळ, ३) बाबर प्रवीण तानाजी
चिखलठाण गटातून
१) पाटील नंदकुमार, २) देवकर अण्णासाहेब भागवत
मांगी गटातून
१) वाळुंजकर संतोष नारायण,
भिलारवाडी गटातून
१) बाबर प्रवीण तानाजी,
इतर मागासवर्गीय गटातून
१) बोबडे मारुती रंगनाथ,२) भानवसे अंकुश रामचंद्र,
एस.सी. गटातून
१) जाधव अशोक उत्तम,
एनटी गटातून
१) डोंबाळे भगवान गणपत
महिला राखीव गटातून
१) माया रामदास झोळ, २) फलके अश्विनी सुनील