३ जूनपासून कार कुकडी कॅनलजवळ उभी - कारमधील मृतदेह येवल्याचा - Saptahik Sandesh

३ जूनपासून कार कुकडी कॅनलजवळ उभी – कारमधील मृतदेह येवल्याचा


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.5: करमाळा-मांगी रस्त्यावरील आयटीआय परिसरात कुकडी कॅनल जवळच शनिवारी रात्री पासून स्वीफ्ट कार क्रमांक एम.एच 15 सी.टी. 8006 ही उभा होती. २-३ दिवस ही गाडी जागीच राहिल्याने स्थानिकांना संशय आला. त्यात  तरूणाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. यानंतर करमाळा पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली.

करमाळा पोलीसांची कमाल – १६ तासात खुनाचा तपास – संशयिताला घेतले ताब्यात..

घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, उपविभागीय पोलीस प्रमुख अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. श्रावण रघुनाथ चव्हाण (वय ४०) हे त्या मृत व्यक्तीचे नाव असून तो रा. अडसुरेगाव ता. येवला जिल्हा नाशिक येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर कार मधील मृतदेह अर्धवट जळाल्याचे दिसले.

सदरचा खून हा कोणत्या कारणावरून झाला याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना सदरच्या घटनेबाबत माहिती मिळताच त्याचे नातेवाईक हे करमाळा येथे दाखल झाले. शवविच्छेदन करून खून कसा झाला याविषयी प्रक्रिया सुरू आहे. पोलीस खुनी शोधण्याच्या कामाला लागले आहे.

येवला पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्ती हरवला असल्याची तक्रार नातेवाईकांनी नोंदवली होती. मागील तीन दिवसांपासून सदरचे मृत शरीर हे कारगाडीतच असल्याने सध्या त्या शरीराची वाईट अवस्था झाली आहे. चेहरा पट्टी ओळखणे कठीण झाले आहे. अहवाल येईपर्यंत नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजले नसले तरी पोलिसांचा योग्य दिशेने चालू असल्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी सांगितले.

करमाळा पोलीसांची कमाल – १६ तासात खुनाचा तपास – संशयिताला घेतले ताब्यात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!