प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत श्रावणी आली केम केंद्रात प्रथम - केम ग्रामस्थांकडून सत्कार संपन्न - Saptahik Sandesh

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत श्रावणी आली केम केंद्रात प्रथम – केम ग्रामस्थांकडून सत्कार संपन्न

श्रावणीचा सत्कार केल्या प्रसंगीचा फोटो

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – मेहनत, जिद्द, आणि काहीतरी करण्याची उमेद मनात ठेवून घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केमच्या उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी श्रावणी वेदपाठक दहावीत ९६ टक्के गुण मिळवून केम केंद्रात पहिली आली आहे. या यशामुळे तिनें सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.तिच्या या यशाबद्दल केम ग्रामस्थांच्या वतीने श्रावणीचा आई-वडिलांसमवेत सत्कार करण्यात आला.

श्रावणीच्या आई सोनिया वेदपाठक या केम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतात. तर वडील केम येथील डि.सी.सी बॅंकेत शिपाई म्हणून काम करत आहेत. तिने घरी असलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभ्यास करून यश संपादित केले आहे. श्रावणीच्या घरची आर्थिक परिस्थिती व तिची हुशारी पाहून तिला आधार द्यावा या हेतूने केम येथील खाजगी क्लासेसच्या संचालिका सौ. नागटिळक मॅडम यांनी तिचा मोफत क्लास घेतला व मार्गदर्शन केले.

मी दररोज आई-वडिलांना मदत करीत अभ्यास करत होते. माझ्या यशात माझ्या आई-वडिलांबरोबरच श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल मधील सर्व शिक्षकांचे तसेच माझ्या खाजगी क्लासेसच्या संचालिका सौ नागटिळक मॅडम यांचे मोठे योगदान आहे. भविष्यात एम.बी.ए. करण्याचा माझा मानस आहे.

श्रावणी वेदपाठक

आर्थिक मदतीचे केले आवाहन
घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत श्रावणी वेदपाठक हिने दहावीत यश मिळविले आहे परंतु उच्च शिक्षणासाठी तिला आर्थिक मदतीची गरज असल्याने केममधील ग्रामस्थांनी तिला मदत करण्यास सुरुवात केली आहे. जर कुणी मदत करण्यास इच्छुक असल्यास
खालील खात्यावर मदत करावी असे आवाहन तिच्या सत्कार समारंभात आयोजकांनी केली.

  • खातेदाराचे नाव – बापुराव पोपट वेदपाठक
  • खाते क्रमांक. 20260543734
  • शाखा – बँक ऑफ महाराष्ट्र, केम
  • आय एफ सी कोड – MAHB0000549

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!