रिद्धी सिद्धी संस्थेच्यावतीने रावगाव येथील शामल पवार यांची फिलोशिप 2023 साठी निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : भास्कर पवार यांजकडून..
करमाळा : रिद्धी सिद्धी संस्था संचलित उमेद ESPC फिलोशिप कार्यक्रम 2023 अंतर्गत शामल पवार यांची फिलोसिफ साठी निवड करण्यात आली आहे. रिद्धी सिद्धी संस्था संचलित उमेद ESPC शुभारंभ कार्यक्रम व्ही.के. रिसॉर्ट मसवड येथे संपन्न झाला तत्पूर्वी या संस्थेच्या वतीने काही अर्ज मागविण्यात आले होते यामध्ये 38 अर्जाची छाननी होऊन 18 अर्ज पुढील मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली यामध्ये शामल पवार यांचे करमाळा तालुक्यात असणारे उल्लेखनीय असे काम बघून त्यांच्या या कामाबद्दल त्यांना संस्थेच्यावतीने 2023 च्या फिलोसिप साठी निवड करण्यात आली.
त्यांनी आतापर्यंत महिलांमध्ये बचत गट, महिलांना व्यवसायास प्रवृर्त करणे ,बँक प्रकरणे, बांधकाम कामगारांना शासकीय योजना मिळवून देणे, मोफत इ-श्रम कार्ड काढून देणे, तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती पर कार्यक्रम राबविणे, महिलांना उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवून देणे , विधवा, परित्यक्त ,एकल महिलांना त्यांच्या हक्काचे शासकीय योजना समजावून सांगणे व मिळवून देणे यामध्ये त्यांचा पुढाकार आहे आज पर्यंत त्यांनी गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न सुशिक्षित बेकारांना एकत्र करणे तसेच महिलांना विविध व्यवसाय करण्यास कारणीभूत करणे याबाबत त्यांना नामांकन मिळाले आहे या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या हस्ते तसेच मुक्तागिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्पणाताई देसाई ,मंगल पोळ, बंटी माने ,कमल कोकरे, नयना चव्हाण, अर्पण नराळे, डॉ. जयदेव काळेल, ईश्वर नरळे, प्रियंका नरळे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत शामल पवार यांना उमेद फेलोशिप चे पत्र प्रदान करण्यात आले आहे ,संस्थेच्या वतीने सांगली ,सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्याची निवड करण्यात आली होती.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून शामल पवार यांची निवड करण्यात आलेली आहे या प्रक्रियेसाठी औरंगाबादचे तहसीलदार सिद्धार्थ गायकवाड सोशल संस्था माळशिरसचे कुमार लोंढे ॲड.विकास चव्हाण व आधार सामाजिक संस्था परंडाचे जुलपेकर काझी या टीमने 18 जणांच्या मुलाखती घेऊन 15 उमेदवारांच्या फिलोसिप साठी निवडी करण्यात आल्या या निवडीमध्ये श्यामल पवार यांची प्रामुख्याने निवड करण्यात आलेले आहे ,रिद्धी सिद्धी संस्थेच्या संस्थापिका सुरेखा काळेल यांनी संस्थेचा लेखाजोखा समोर मांडला सामाजिक कार्य करत असताना येणाऱ्या अडीअडचणी व त्यांना देण्यात येणारे तोंड याविषयी त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले संस्थेकडे असणारा उमेद कमवा आणि शिका हे केंद्र कसे चालू केले त्यानंतर उमेद महिला विकास निधी लिमिटेड बँक कशी स्थापन केली कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन नवी दिल्ली व रिद्धी सिद्धी संस्था दोन्ही संस्थेबरोबर चालू असणाऱ्या मुलावर चा प्रोजेक्ट, जैवविविधता अशा अनेक प्रोजेक्ट विषयी त्यांनी माहिती सांगितली शासकीय योजना व इतर योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रामुख्याने ही संस्था करत आहे याचाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या फिलॉसिपांची निवड करून सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे त्यांनी सांगितले यापुढे संस्थेच्या माध्यमातून महिला, युवक ,युवती सुशिक्षित बेकार,जेष्ठ नागरिक, तसेच इतर लोकांचे गट तयार करून त्यांना विविध शासकीय योजना व व्यवसाय भिमुख शिक्षण देण्याचे प्रयत्न शामल पवार करणार आहेत त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.कार्यक्रमाचे सुञसंचालन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रिया साठे यांनी तर आभार संस्थेचे अध्यक्ष विजय काळेल यांनी केले.