केम येथे होणाऱ्या नवीन दत्तमंदिराच्या बांधकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
केम (प्रतिनिधी-संजय जाधव) – केम-पाथुर्डी रोडवर नव्याने होत असलेल्या दत्तमंदिराच्या बांधकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज (दि.१४) पार पडला. हे भूमीपूजन केम गावचे युवा नेते सागर दोंड व त्यांच्या पत्नी, तसेच नामदेव तळेकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. केम मधील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
केम येथील श्री ऊत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांचा केम-पाथुर्डी रोड लगत मठ आहे. केम मधील माऊली नामदेव तळेकर यांनी या मठासाठी एक एकर जमीन दान केली आहे. या मठात दत्तमंदिराचे बांधकाम करण्याचे ठरले होते. आज या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. या पूजेसाठी कुंभार महाराज व अविनाश कुलकर्णी हे उपस्थित होते. त्यानंतर आरती झाली व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले. शेवटी सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाला केम गावचे ज्येष्ठ नेते दिलीप दादा तळेकर,. सरपंच आकाश भोसले, चेअरमन बाळू म्हेत्रे, अच्युत काका पाटील पांडुरंग तळेकर, विष्णू अवघडे,संजय दौंड, ह.भ.प.मारूती पळसकर, रमेश तळेकर,ज्ञानदेव तळेकर, राहुल कोरे, सुरेश गूटाळ,संजय गुरव, महाराज संदिपगोडसे, सचिन रणश्रृंगारे, महादेव पाटमास, श्रीराम गलांडे, देवा काशीद, तानाजी वायभासे, केदार, श्री.अवचर, नारायण बिचीतकर, ऊत्तरेश्वर टोणपे नामदेव वळेकर आण्णा वळेकर, ज्ञानदेव तळेकर,माउली तळेकर दत्तात्रय बिचितकर आदिजन उपस्थित होते