गाव तिथे शाखा…घर तिथे कार्यकर्ता हे धोरण राबविणार – नुतन करमाळा तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष संभाजी शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : गाव तिथे शाखा…घर तिथे कार्यकर्ता हे धोरण राबवुन काम करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस आय नुतन करमाळा तालुका युवक अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केले आहे.
टिळक भवन मुंबई येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास, राष्ट्रीय निरिक्षक कृष्णा अलावारु, प्रदेशाध्यक्ष मा.कृणाल राऊत यांच्या उपस्थितीत संभाजी शिंदे यांना निवडीचे अधिकृत पत्र देण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, युवक शहराध्यक्ष सुजय जगताप,ओ.बी.सी.तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख, उपाध्यक्ष सुलतानभाई शेख,अशोक घरबुडे,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख ओ.बी.सी. जिल्हाउपाध्यक्ष दस्तगीर शेख,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुरुवातीला नुतन युवक तालुकाध्यक्ष संभाजी शिंदे यांचा सत्कार प्रतापराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रतापराव जगताप यांनी संभाजी शिंदे यांना शुभेच्छा देताना आजपर्यंतच्या कार्याचे कौतुक करत एका अभ्यासु युवा नेतृत्वाला काम करण्यासाठी मोठी संधी मिळाली असुन त्या संधीचे सोने संभाजी शिंदे यांनी करावे अशी विनंती केली. सत्काराला उत्तर देताना संभाजी शिंदे यांनी सांगितले की इथुन पुढे “गाव तिथे शाखा”, “घर तिथे कार्यकर्ता” हे धोरण संपुर्ण तालुक्यात राबवणार असुन काँग्रेस पक्षाचे विचार समाजातील शेवटच्या तळागाळा पर्यंत पोहचवणार असुन देशाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.मल्लिकार्जुन खर्गे,मा.सोनीया गांधी,मा.राहुल गांधी,मा.प्रियंका गांधी,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, देशाचे नेते सुशिलकुमार शिंदे,जिल्हाध्यक्ष डाॕ.धवलसिंह मोहीते पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सुनंजयदादा पवार,ता.अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नागरीकांच्या अडीआडचणी सोडवण्यासाठी कटिबध्द असुन सध्या वाढलेली महागाई,वाढती बेरोजगारी, जी.एस टी.यामुळे नागरीक व व्यापारी वर्ग चिरडला गेला असुन या विषयावर आंदोलन करणार असुन सामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.
संभाजी शिंदे यांच्या निवडीचे स्वागत सर्वत्र होत असुन सावडी गावात फटाक्याची आताषबाजी करुन स्वागत करण्यात आले.यावेळी दशरथ जाधव,भैय्याराजे देशमुख,भाऊ भोसले,भिमराव शेलार,मयुर काळे,नाना जाधव,शहाजी शेळके,बाळासाहेब ठेंबे,विशाल शेलार,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.