परांडा येथे ५३ जनावरांची कत्तल करण्यासाठी घेवून जाणारा पिकअप केमजवळ पोलिसांनी पकडला
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – अकलुज येथुन ५३ जनावरांना पिकअप मध्ये भरून परांडा येथे कत्तली करीता घेवून जाताना केमजवळ पोलिसांनी गाडी अडवून पकडली व यात ड्रायव्हर सह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल (दि.२६) केम येथील तळेकर पेट्रोल पंप जवळ घडली. कंदर येथील काही नागरिकांनी याबाबत पोलिसांना सतर्क केले होते. यामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार संजय धर्मा जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले की, मी केम दुरक्षेत्र अंमलदार म्हणुन काम करीत आहे. दिनांक २६ जून रोजी दुपारी ३.२० वा. चे सुमारास मी व पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे यांच्यासोबत केम दुरक्षेत्र येथे हजर असताना कंदर येथील गोरक्षकांनी मला कळविले कि, कंदर येथून एक पिकअप जनावरे भरून केमच्या दिशेने येत आहे. त्यानंतर आम्ही दोघांनी कंदर कडून केम कडे येणाऱ्या रोडवर केम येथील तळेकर पेट्रोल पंपाजवळ थांबलो. थोडया वेळाने ४ च्या सुमारास कंदर कडून एक पिकअप आमचे दिशेने येत असल्याचे आम्हाला दिसले. त्याच वेळी पिकअपचा पाठीलाग करत काही लोक पिकअप मागे येत होते. त्यांनी पिकअप थांबविली त्यावेळी पिकअप मधील एक जण पळुन जात होता पिकअपचे मागे आलेले लोक पिकअप मधुन पळुन जात असलेल्या इसमांचा पाठलाग करून त्यास हाताने व लाथाबुक्याने मारहाण करीत होते. त्याच वेळी आम्ही तेथे गेलो त्यावेळी सर्व लोक निघुन गेले.
सदरचे पिकअपचे पाठीमागील बाजूस जावून पाहणी केली असता त्यात निर्दयीपणे जर्सी गायीचे वासरे भरल्याचे दिसले. त्यावेळी पिकअपचा नंबर पाहिला असता त्याचा नंबर एमएच 11 सीएच 8673 असा असून त्यास करमाळा पोलीस ठाणे येथे घेवून आलो. सदर वाहनांचे पाठीमागील पडदे उचलून पाहणी केली असता हौदामध्ये दाटीवाटीने कोंबून एकुण ५३ जनावरे त्यात ०२ रेडे व ५१ जर्सी गायीची वासरे,खोंड मिळून आली. त्यातील काही वासरांच्या तोंडाला चिकटपट्टने तोंडे बांधलेली दिसले. तसेच त्यातील काही गायीच्या वासरांचे एकमेकांचे पाय पडून चेंगरलेचे दिसले. एकुण ३ गायीच्या खोंडांना कशाच्या तरी साहाय्याने ठार मारल्याचे दिसुन आले. त्यातील एका खोंडाच्या गळयाला कापल्याचे दिसले.
सदर पिकअप मधील चालक व इतर दोघांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नांवे 1) फिरोज वाहिद कुरेशी (वय 24) धंदा ड्रायव्हर रा अकलूज ता माळशिरस 2) रफीक कालेखान जमखंडी (वय 28) धंदा मजुरी गोकाक ता गोकाक जि बेळगांव रा कर्नाटक सध्या स्टार बेकरी अकलुज ता माळशिरस जि सोलापूर 3) रशिद इस्माईल बेपारी (वय 45) धंदा मजूरी रा कासार पटटा इंदापूर जि पुणे असे असल्याचे सांगितले. त्या सर्वांना ही जनावरे कोठून आणले बाबत विचारले असता त्यांनी अकलुज येथुन भरून ती खोंडे व रेडया या परांड येथे कत्तली करीता घेवून जात असल्याचे सांगितले. आम्ही त्यांच्याकडे जनावरे वाहतुकीचा परवाना व जनावरांचा पशु वैदयकीय दाखला आहे का असे विचारले असता त्यांनी आमच्या कडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगुन जनावरे ही कत्तल करीताच नेत असल्याचे सांगितले.
तरी दिनांक २६ जून रोजी दुपारी ४ वा. चे सुमारास केम ता करमाळा येथील तळेकर पेटोल पंप येथे चालक 1) फिरोज वाहिद कुरेशी वय 24 धंदा ड्रायव्हर रा अकलूज ता माळशिरस व त्याचे सोबतचे 2) रफीक कालेखान जमखंडी वय 28 धंदा मजुरी गोकाक ता गोकाक जि बेळगांव रा कर्नाटक सध्या स्टार बेकरी अकलुज ता माळशिरस जि सोलापूर ता माढा 3) रशिद इस्माईल बेपारी वय 45 धंदा मजूरी रा कासार पटटा इंदापूर जि पुणे यांनी त्यांचे ताब्यातील पिकअप नंबर एमएच 11 सीएच 8673 या वाहनांमध्ये एकुण 53 त्यामध्ये 51 जर्सी गायीची खोंडे काळया पांढ-या रंगाची व दोन काळे रंगाच्या रेडया असे 53 जनांवरांना दाटीवाटीने कोंबून त्यांची तोंडे चिकट पट्टीने बांधून त्यांना निर्दयतेने वागणूक देवून सदर जनावरांना चारा पाणी अगर औषधाची सोय न करता जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना मिळून आले तसेच पिकअप जिप मधील तीन जर्सी गायीची खोंडे कशाचे तरी साहाय्याने ठार मारली आहेत म्हणुन माझी त्यांचे विरूध्द सरकार तर्फे भा.दं. वि. कलम 429, 34 सह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (1), 11 (1)(अ),11(1)(एफ),11(1)(एच) 11(1)(आय), 11(1)(के) व प्राणी परिवहन अधिनियम 1978 चे कलम 47,54,56 पशुसंवर्धन अधिनियम 1951 चे कलम 5 व मो. वा. का. कलम 83 / 177 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे.