चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये बालगोपाळांची दिंडी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथील छोट्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्रितपणे येऊन बालदिंडी काढली होती.विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे व संदेश देणारे फलक घेतले होते.झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव, निसर्गाचे संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलनाचे संदेश देणारे फलक होते.
विद्यार्थ्यांनी अभंग, भारुड, संतांची माहिती, गोल रिंगण, पारंपरिक फुगडी सादर केली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई,मुक्ताई, जनाबाई, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ,गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या होत्या.वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषा करून कुगाव मध्ये दिंडी काढण्यात आली होती.आरुष अंकुश जाधव व गोपी बाबुराव गुंड आणि तन्मय भगवंत बोराडे व स्वरा प्रदीप शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख परिधान केला होता.
यावेळी कुगावचे सरपंच संदीपान कामटे यांनी इरा पब्लिक स्कूल चे अध्यक्ष डॉ.ब्रिजेश बारकुंड व सचिव सुनिल अवसरे यांचे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केले .सरपंच संदिपान कामटे ,उपसरपंच मन्सूर सय्यद ,आजिनाथ कारखाना माजी संचालक आबासाहेब डोंगरे ,कुगावचे पोलीस पाटील दादा हराळे ,मारुती गावडे ,नवनाथ अवघडे ,आजिनाथ भोसले ,दादासाहेब डोंगरे ,सागर पोरे, शाबुद्दीन सय्यद, उद्धव गावडे व सर्व ग्रामस्थांनी या दिंडी साठी अन्नदानाचे नियोजन केले.
या शाळेच्या या भव्यदिव्य दिंडीचे नियोजन केल्याबद्दल शाळेचे कौतुक केले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड यांनी सर्व ग्रामस्थांचे विशेष आभार मानले. हा सोहळा संपन्न करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश बारकुंड, सचिव सुनिल अवसरे,मुख्याध्यापक, शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ड्रायव्हर आदिंनी अथक परिश्रम घेतले.