शेटफळ येथे कृषी दिनानिमित्त महिला शेतकऱ्यांसाठी शेतीशाळेत कृषी व आरोग्य विषयक मार्गदर्शन.. - Saptahik Sandesh

शेटफळ येथे कृषी दिनानिमित्त महिला शेतकऱ्यांसाठी शेतीशाळेत कृषी व आरोग्य विषयक मार्गदर्शन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कृषी दिनानिमित्त शेटफळ (ता.करमाळा) येथे महिला शेतकऱ्यांसाठी आयोजित शेतीशाळेत महिलांना कृषी व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्यावतीने कृषी संजीवनी मोहीमेअंतर्गत शेटफळ गावातील महिला शेतकऱ्यांसाठी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहयक कृषी अधिकारी सुप्रिया शेलार यांनी उपस्थित महिलांना पांडुरंग फुंडकर फळबाग योजना, रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवड ,कृषी यांत्रिकीकरण योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, हुमणी आळी किड नियंत्रण सेंद्रिय शेती तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक आहार प्रसारांतर्गत तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती दिली तर डॉक्टर दिनानिमित्त शेटफळ येथील डॉ अमृता लबडे यांचा सन्मान जेष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शेतातील मातीचे आरोग्य व मातेचे आरोग्य यांचे महत्त्व सांगत महिलांचे आरोग्य विषयक समस्या या विषयावर मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांचे आजार याविषयी माहिती देत आरोग्य विषयक प्रबोधन केले. यावेळी उपस्थित महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या कार्यक्रमात रिंगण सोहळा फुगड्या व उखाणयांनी कार्यक्रमाला रंगत आणली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजामाता महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षाली नाईकनवरे,यांनी केले तर आभार मंगल जाधव यांनी मानले.यावेळी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आदर्श महिला शेतकरी म्हणून गौरविण्यात आलेल्या गंगाताई लबडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिजामाता महिला शेतकरी गटाच्या मंदाकिनी साळूंके,निता पोळ , सुषमा पोळ,प्रतिभा पोळ,मिनाताई वळेकर,माधवी बारकुंड,वनिता निंबाळकर, मंगल नाईकनवरे,जया पोळ, शकुंतला लबडे, सुनंदा मोरे, प्रभावती नाईकनवरे स्वरूपा लबडे, संजीवनी लबडे ,वनमाला पोळ,विद्या पाटील, वैजयंता नाईकनवरे, यांच्यासह गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!