करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.सोनवणे तर उपाध्यक्षपदी ॲड.देवकर यांची बिनविरोध निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.डि.एम. सोनवणे, उपाध्यक्षपदी ॲड.जे.डि.देवकर, सचिवपदी ॲड.विनोद चौधरी तर सहसचिवपदी ॲड.सुनील घोलप यांची निवड बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आज (ता.३) करमाळा न्यायालयात करमाळा बार असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक करमाळा बार चे मावळते अध्यक्ष ॲड.विकास जरांडे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. आज झालेल्या बैठकीमध्ये करमाळा वकील संघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते, प्रथेप्रमाणे अध्यक्षपदासाठी जेष्ठ वकिलांना बिनविरोध संधी दिली जाते, त्यानुसार ॲड.डी एम सोनवणे यांना यावेळी संधी दिली आहे.

ॲड. सोनवणे हे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक असून, अजून पांगरे गावच्या ग्रामपंचायतीची सूत्रे त्यांच्याकडेच आहेत, सामाजिक कार्याबरोबरच त्यांचा वकील क्षेत्रातील अनुभव महत्त्वाचा आहे, त्यांच्या या निवडीबद्दल वकील संघाचे जेष्ठ सदस्य ॲड.लुणावत, ॲड.भाऊसाहेब वाघमोडे, ॲड.एस.पी.रोकडे, ॲड.डॉ.बी.टी.हिरडे, ॲड.अशोक गिरंजे, ॲड.कमलाकर वीर, ॲड.आर.व्हि.दिवाण, ॲड.सविता शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे याच बैठकीत उपाध्यक्ष म्हणून ॲड.देवकर तसेच सचिवपदी ॲड.विनोद चौधरी तर सहसचिवपदी ॲड.घोलप यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली असून, या सर्वांचे सत्कार मावळते अध्यक्ष ॲड.जरांडे, ॲड.योगेश, ॲड.एम.डी.कांबळे यांनी केले. याप्रसंगी करमाळा वकील संघाचे सर्व जुनिअर व सिनिअर ॲडव्होकेट उपस्थित होते.

