तुषार शिंदे यांचा कंदर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न

कंदर प्रतिनिधी/ संदीप कांबळे
कंदर : कंदर ता करमाळा येथील शेतकरी कुटुंबातील श्रीहरी शिंदे यांचे सुपुत्र तुषार शिंदे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवेच्या आधिकारी पदी निवड झाली. शिंदे देशात ३६ व्या रँकने उत्तीर्ण झाले आहेत .सतत अभ्यास,परिश्रमाच्या बळावर,सर्वसामान्य कुटुंबातील तुषार यांनी उच्च पदाला गवसणी घातली आहे. कंदर मध्ये ग्रामस्थांच्या वतीने वाजतगाजत तुषार शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
तुषार शिंदे यांनी विठ्ठल मुर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांची घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. तुषार शिंदेच्या यशाबद्दल कंदर ग्रामस्थांना मोठा आनंद झाला. तुषार शिंदे यांनी आई वडीलांचे व कंदर गावाचे नाव मोठे केले आहे.त्यांच्या सत्कार समारंभाला कंदर गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तुषार शिंदेच्या कुटुंबातील सर्व सदस्य, आदिनाथ कारखाण्याचे माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे , करमाळा बाजार समितीचे संचालक रंगनाथ शिंदे , नवनाथ शिंदे ,बंडू माने, आनंद मोहिते ,अमर भांगे, नानासाहेब प्रभाकर लोकरे ,अभिजित भांगे , संभाजी लोंढे , सुभाष पवार ,नवनाथ कदम, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, दत्तात्रय भिल ,काका शिंदे, नवनाथ काळे ,संपतराव सरडे ,कृषी अधिकारी दादासाहेब पवार ,ह भ प बाळासाहेब भोसले, विजयसिंह नवले, दादासाहेब मंगवडे,अजित वगरे, गणेश मंगवडे,विठ्ठल काळे ,सुहास कदम ,दिलावर शेख ,अरुण सरडे ,रोहिणी वीर, गणेश देवकर, कल्याण सरडे , मेजर गणेश लोकरे , आदी मोठ्या प्रमाणात कंदर ग्रामस्थ उपस्थित होते. तुषार शिंदे याचा जिल्हा परिषद शाळा कंदर तसेच कनवमुनी विद्यालय कंदर येथे सत्कार करण्यात आला.

