दारू पिऊन मोटारसायकल चालविणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : दारू पिऊन रस्त्यावर अडखळतपणे मोटारसायकल चालविणाऱ्या मोटारसायकल चालकाविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ७ जुलैला बाराच्या सुमारास बायपास रस्त्यावर घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिपक नागनाथ कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की ७ जुलैला आम्ही जयहिंद हॉटेल जवळ, बायपास रोडवर वाहतुक नियमन करत असताना करमाळा शहरातून राजेंद्र बापुराव राऊत (रा. मुळेवस्ती, ता. आष्टी) हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्र. एमएच ४२ एजी ७९४ अडखळत चालवत आलेला दिसला.
त्यास हात करून थांबविले असता, तो दारू पिल्याचा संशय आला. त्यानंतर त्याची ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता तो दारू पिलेला आढळला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

