पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या युवकांची शेटफळ येथे घोड्यावरून मिरवणूक व नागरी सत्कार - Saptahik Sandesh

पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या युवकांची शेटफळ येथे घोड्यावरून मिरवणूक व नागरी सत्कार

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या चिखलठाण (ता.करमाळा) परिसरातील अमित लबडे, श्रीकांत गोडगे, अक्षय पवार या युवकांचा शेटफळ (ना) (ता.करमाळा) येथील ग्रामस्थांच्यावतीने घोड्यावरून मिरवणूक काढून नागरी सत्कार कार्यक्रम करण्यात आला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून या युवकांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे, त्यामुळे शेटफळ ग्रामस्थांनी या सत्काराचे आयोजन केले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप, कीर्तनकार विठ्ठल पाटील महाराज उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासुन हालगी लेझीमचा जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अमित लबडे बरोबरच बोलताना गायकवाड म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आई-वडिलांनी टाकलेल्या मुलांनी विश्वासाला तडा जाऊ देऊ नये आईवडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवली तर यश मिळते. लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत ग्रामीण भागातील युवकांचा टक्का वाढत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे ग्रामीण भागातील पालक जागरूक झाले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. यांच्यापासून प्रेरणा घेऊन तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा यश मिळवावे व पालकांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र पोलीस नवनाथ नाईकनवरे यांनी केले. यावेळी शंभुराजे जगताप विठ्ठल पाटील महाराज आकाश बुरगुटे, बापू नाईकनवरे महाराज‌ कार्यकारी अभियंता विवेक लबडे वैभव नलवडे व‌ सत्कारमुर्तींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार सतीश लबडे यांनी मानले. या कार्यक्रमाला सरपंच विकास गुंड बाजार समितीचे संचालक गोरख लबडे,मकाईचे माजी संचालक किरण पोळ, उपसरपंच अजित नाईकनवरे,भारत पाटील मनोहर लबडे, पांडुरंग लबडे, शिवाजी पोळ विलास लबडे, सुहास पोळ, बाबूराव चोरगे, राहुल लबडे यांच्यासह ग्रामस्थ बहूसंखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!