‘हिरडगाव कारखान्याचे’ थकीत ऊस बिल बँकेत जमा – ॲड राहुल सावंत
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील श्री.साईकृपा शुगर & अलाईड इंडस्ट्रीज लि. या कारखान्याचे सन २०२२-२३ चे २७०० रुपये प्रति टना प्रमाणे चौदा कोटी चौसष्ट लाख रुपये बील शेतकऱ्यांचे बॅंक खात्यात जमा झाले अशी माहिती हमाल पंचायत अध्यक्ष व पंचायत समिती माजी सदस्य ॲड राहुल सावंत यांनी दिली.
याबाबत बोलताना ॲड.राहुल सावंत म्हणाले की, करमाळा आणि परांडा तालुका येथील शेतकर्यांना सुमारे ६ महिने उलटून पैसे न दिल्याने शेतकर्यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान तहसीलदार श्री मिलिंद कुलथे यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते उपोषण स्थगित केले होते.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, सन २०२२-२३ या गळीत हंगामासाठी विक्रम ( विकी ) बबनराव पाचपुते यांच्या खाजगी मालकीचा साईकृपा शुगर & अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड हिरडगाव या कारखान्याने करमाळा आणि परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतिटन २७०० रुपये बाजार भाव देऊ असे सांगून उस गाळपासाठी आणला. ऊस गाळपानंतर १४ दिवसात २७०० रुपये प्रमाणे प्रति टन रक्कम देणे बंधनकारक असताना ही सुमारे ६ महिने उलटून गेले तरी वेळोवेळी पत्र व्यवहार करून, पाठपुरावा करून हेलपाटे मारूनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये कारखाना प्रशासनाने दिले नव्हते.
त्यामुळे करमाळा व परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे बिलाची रक्कम व्याजासह त्वरित देण्यात यावे यासाठी अँड. राहुल सावंत (मा. सदस्य पंचायत समिती करमाळा ), बाळासाहेब गायकवाड (तालुकाध्यक्ष रयत क्रांती शेतकरी संघटना करमाळा), राहुल चव्हाण (मा. सरपंच परांडा), विलास बरडे, सुखदेव चव्हाण, नंदकुमार पाटील, सुनील चव्हाण, अंगद चव्हाण, नाना चव्हाण, हनुमंत पाटील, देविदास पाटील, वसंत चव्हाण, धनंजय कुलकर्णी , सुभाष गणेशकर ,दत्तात्रय सरोदे, रमेश पाटील, बाबासाहेब पाटील, युवराज दळवी, सुग्रीव चव्हाण, सोमा धनवे, अनिल पुंडे ,वालचंद रोडगे, नवनाथ कोळेकर, बापू जाधव ,रामदास मोडके, सुरज मोडके, युवराज पडळकर , रणजीत बेरगळ, संकेत मल्लाव ,महादेव मस्के ,वैभव मस्के, आकाश कुरकुटे ,गजानन गावडे, सागर सामसे, बापू उबाळे व शेतकरी करमाळा व परांडा तालुक्यातील शेतकरी यांनी दि. ५/६/२०२३ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले होते.
त्या दरम्यान तहसीलदार श्री मिलिंद कुलथे यांनी शेतकऱ्यांची ऊस बिलाची रक्कम 20 जून 2023 पर्यंत देऊ असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दि. 5/ 6/ 2023 रोजी दिले. त्यावेळी तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले होते की, आम्ही आरआरसी ची कारवाई करून तुमचे ऊस बीलाची रक्कम 20 जून पर्यंत अदा करण्यात येईल त्यामुळे उपोषणकर्त्यांना सदरचे उपोषण तात्पुरते स्थगित करा अशी विनंती केली.
त्यानंतर 20 व 21 जून 2023 रोजी जवळपास पाच कोटी बेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांचे बॅंक खात्यात जमा झाले. यावेळी तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम अदा करणे गरजेचे होते परंतु कारखान्याने तसे न केल्यामुळे
त्यानंतर राहिलेले / उर्वरित शेतकरी यांना ऊस बिलाची रक्कम न मिळाल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता.
त्यासाठी सर्व वरिष्ठ संबंधित कार्यालय मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद, जिल्हाधिकारी सोलापूर, मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. पोलिस अधीक्षक सोलापूर यांना वारंवार पत्र व्यवहार, ई-मेल आयडी , व्हाट्सअप, फोन करून पाठपुरावा केला. तसेच मा. सिध्देश्वर सालीमठ जिल्हाधिकारी अहमदनगर, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत येलगुंडवार पुणे , मा. यशवंत गिरी पुणे उपजिल्हाधिकारी मा. राजेंद्र पाटील अहमदनगर, साखर प्रादेशिक उपसंचालक मा. मिलिंद भालेराव अहमदनगर, श्रीगोंदा उपविभागीय अधिकारी मा. पद्माकर गायकवाड, तहसीलदार श्रीगोंदा मा. मिलिंद कुलथे, कारखान्याचे सर्वेसर्वा आमदार मा. बबनराव पाचपुते व चेअरमन मा. विकी पाचपुते यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार, वारंवार समक्ष भेटून आणि तक्रार करूनही, ई-मेल आयडी , व्हाट्सअप, फोन करूनही 1 जानेवारी 2023 पासून चे थकीत ऊस बीलाची रक्कम मिळावी म्हणून सामुहिक आत्मदहन करणार असा इशारा ॲड राहुल सावंत यांनी दिला होता.
त्यानंतर साखर आयुक्त पुणे यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसीलदार श्रीगोंदा, साखर उपसंचालक प्रादेशिक अहमदनगर, कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांची मिटींग आयोजित केली होती. त्यानुसार साखर आयुक्त यांनी आर आर सी ची कारवाई साठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यासाठी लेखी आदेश देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी श्रीगोंदा उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांची पुढील आर आर सी ची कारवाई करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. तत्पूर्वीच 1 जानेवारी 2023 पासून चे जवळपास नऊ कोटी बावीस लाख रुपये शेतकऱ्यांचे बॅंक खात्यात जमा झाले. असे सुमारे नऊशे चाळीस शेतकऱ्यांना जवळपास एकूण चौदा कोटी चौसष्ट लाख रुपये जमा झाले. अखेर आमच्या आंदोलनाला व उपोषणाला यश आले असे यावेळी ॲड राहुल सावंत यांनी सांगितले.
वरील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचे शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार व धन्यवाद व्यक्त करतो. सदर आंदोलनाला संचालक डॉ. हरिदास केवारे, ॲड. बलवंत राऊत, मा. संचालक हरिभाऊ झिंजाडे, पाराजी शिंदे, दादा क्षीरसागर, मा . सरपंच अजित तात्या शिंदे, श्रीहरी भोगल, शरद शिंदे, मा. सरपंच प्रकाश थोरात, नाना अनारसे, बापू रिटे, ज्योतीराम ढेरे, शिवाजी कुंभार, डॉ. सुभाष शेंद्रे, मा. संचालक विठ्ठल रासकर, चेअरमन मनोज गोडसे, संचालक अरुण चौगुले गुरुजी, चंद्रहास चोरमुले गुरुजी, मा . सरपंच भोजराज सुरवसे, फारूक जमादार, अँड प्रशांत बागल, अभिजीत नरसाळे, ह भ प हनुमंत काळे व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता.