केमचे सुपुत्र मुख्य सरकारी वकील आनंद नरखेडकर यांचा अहमदनगर येथे निरोप समारंभ संपन्न
केम (संजय जाधव) – केम (ता. करमाळा) गावचे सुपुत्र व अहमदनगर जिल्हयाचे सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता (मुख्य सरकारी वकील) यांची प्रशासकीय कारणास्तव बदली सोलापूर जिल्हयात झालेली आहे. त्यांच्या कार्यकालाच्या शेवटच्या दिवशी दि. ११ जुलै २०२३ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अहमदनगर कार्यालयाच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना श्री. नरखेडकर म्हणाले की, मी काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही हि बाब कटाक्षाने पाळली. कार्यालयात येणा-या प्रत्येकाचे काम पुर्ण होऊन समाधान मिळेपर्यंत प्रयत्न केले. कामादरम्यान मला वरिष्ठ कार्यालयाचे, सरकारी वकीलांचे व कर्मचा-यांचे नेहमीच सहकार्य मिळाले.
याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील श्री. सतिश पाटील, अतिरिक्त सरकारी वकील श्री. चौधरी, श्रीमती. ढगे, श्रीमती रासवे, श्री. कोळेकर, श्री. त्रिमुखे श्रीमती. राठोड तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री यादव, श्री. आव्हाड, श्रीमती इथापे, श्रीमती. चव्हाण व कार्यालयीन अधिक्षक श्रीमती सहाणे व सर्व विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या निरोप समारंभामध्ये श्री. नरखेडकर यांनी सेवानिवृत्त होईपर्यंत अहमदनगर येथेच रहावे असा सर्वांचा आग्रह होता. लोकांचे व सहका-यांचे काम हे आपलेच काम आहे अशीच त्यांची तळमळ असायची. भविष्यात ते आणखी उच्च पदावर राहतील अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली.
श्री. नरखेडकर हे केम येथील विष्णू नरखेडकर यांचे चिरंजीव असुन, त्यांची आई शिक्षिका होत्या. श्री. नरखेडकर ह्यांचे उच्च शिक्षण पुणे येथील महाविदयालयात पुर्ण केलेले आहे. महाविदयालयीन शिक्षण पुर्ण करताना त्यांनी अनेक समस्यांना ते यशस्वीपणे सामोरे गेले. सन २००२ साली एमपीएससी ची परिक्षा पास होऊन ते सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदावर रुजु झाले. दिनांक २८ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांची जिल्हा गोंदिया येथून अहमदनगर जिल्ह्यात बदली झाली. अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी एकूण ६ वर्षे १० महिने अविरत शासनाची सेवा केली. त्याचप्रमाणे न्यायालयीन कामकाज व पोलिस खात्याकडील कामकाज यामध्ये त्यांनी उत्तम समन्वय राखला. मोठ मोठया गुन्हयांमध्ये कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपले काम ते इमानदारीने करत राहिले.