शेतीच्या बांधावरून तिघांकडून दांम्पत्यास मारहाण – पोथरे येथील घटना..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेतीच्या बांधावर तार कंपाउंड घालण्याच्या कारणावरून तिघांनी दांम्पत्यास काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.
हा प्रकार ९ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास पोथरे येथे माळवाडी परिसरात घडला आहे. या प्रकरणी शिवाजी प्रेमराज झिंजाडे (रा. पोथरे) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की ९ जुलैला दुपारी दोन वाजता शेतात गेलो असता, आमच्या शेताची मोजणी न होताच अक्षय वसंत झिंजाडे, महेश वसंत झिंजाडे व हौसाबाई वसंत झिंजाडे हे मोजणी न करता आमच्या शेतात तारेचे कंपाउंड लावत होते. असे ताऱ्याचे कंपाउंड करू नका.. असे म्हटल्यावर त्यांनी शिव्या देऊन लोखंडी गजाने व लाकडी काठीने मला व माझी पत्नी कुंदा हीस बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


