ग्राहकांची सेवा हा धर्म मानून संचेती यांची सेवा
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : ग्राहकांची सेवा हा धर्म मानून स्टेट बँकेतील अधिकारी शिवलाल संचेती यांनी जवळपास ३७ वर्षे ग्राहकांची सेवा केली आहे. त्यानिमित्ताने कृतज्ञता सोहळा ९ जुलैला विकी मंगल कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी स्टेट बँकेचे शाखाधिकारी अजय माळू, कर्मचारी युनियनचे सुरेश चिंदरकर, हारूण सय्यद यांचेसह मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सावंत, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबूराव हिरडे, ग्राहक पंचायतचे मार्गदर्शक भालचंद्र पाठक, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर आदी मंडळी व्यासपीठा उपस्थित होती.
यावेळी शाखाधिकारी देडे, तसेच अन्य शाखांचे शाखाधिकारी ॲड. सविता शिंदे, यासह व्यापारी, विविध बँकेतील कर्मचारी पेन्शनर्स तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत संचेती परिवाराच्या वतीने करण्यात आहे.
शिवलाल संचेती यांचे कार्य हे ग्राहकांसाठी आगळेवेगळे होते, आलेल्या ग्राहकास समाधान देणे व त्याच्या अडचणीला मदत करणे हे त्यांचे वेगळेपण होते. कोणताही ग्राहक आल्यास त्याला संचेती यांचाच आधार होता. कोणावरही न चिडता, न रागवता सामंज्यसपणाने सहकार्य देण्याची भुमिका संचेती यांनी निभावली आहे. त्यामुळेच त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर होत असलेल्या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित आहेत.