उस्मानाबादचे उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मीरगणे यांचा टेंभूर्णी येथे सत्कार संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – उस्मानाबाद जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मीरगणे यांची शिक्षण उपसंचालक पुणे कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल टेंभूर्णी येथे शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भैरवनाथ विद्यालय, आलेगाव मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख, टेंभूर्णी कन्या प्रशालेचे सुपरवायझर सोमनाथ नाळे, उद्योजक गोरख खटके पाटील महात्मा फुले शिक्षण संस्था केम अध्यक्ष महेश तळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
रावसाहेब मीरगणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात रायगड, सोलापूर, अहमदनगर,पुणे आदी ठिकाणी काम केले असून सध्या उस्मानाबाद येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या क्षेत्रात चांगला ठसा उमटविला असून प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करत आहेत.


