प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना व विविध योजनांचे माहिती कार्यक्रम जिंती येथे संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२१) : जिंती (ता.करमाळा) येथे कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधान मंत्री फसल बीमा योजना 2024, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना व विविध योजनांचे माहितीचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी देवीदास चौधरी, मंडळ अधिकारी संतोष गोसावी, कृषी पर्यवेक्षक उमाकांत जाधव, महेश काळे सरपंच प्रतिनिधी, ओंभासे कृषी सहाय्यक, विनोद सोनवणे, हरि दळवी, अशीफ तांबोळी, श्रीमती सारिका करपे, फारूक बागवान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचे जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे व मंगेश भांडवलकर,दिलीप दंगाणे व जिंति गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी श्री देवीदास चौधरी मंडळ कृषी अधिकारी यांनी एक रुपयात प्रधान मंत्री फसल बीमा योजना मधे विमा कसा भरावा या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व प्रातीनिधिक एक अर्ज प्रतक्ष्य भरुन दाखवला.तसेच विमा कसा मिळते याची माहिती सांगितली.खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकामध्ये तूर मूग उडीद गळीत धान्य मधे सूर्यफूल, तृणधान्ये मधे बाजरी मका भाजीपाला पिकांत कांदा या पिकांचा समावेश असतो असे सांगितले.
यानंतर कृषी पर्यवेक्षक श्री उमाकांत जाधव यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने पौष्टीक तृणधान्ये लागवड तंत्रज्ञान व त्यांचे आहारातील महत्त्व उपस्थित शेतकरी बांधवांना सागितले.
मनोज बोबडे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना या मध्ये ज्वारी,बाजरी, मका,गहू ,नाचणी वरई प्रक्रिया ,मसाले प्रक्रिया, दूध प्रक्रिया ,डाळ मिल, बेसन व्यवसाय, पापड उद्योग, शेवया उद्योग तेलघाना पशुखाद्य,आंबा व सर्व फळे प्रक्रिया गुळ व्यवसाय महाराष्ट्र शासन कृषी विभागाची ३५ टक्केअनुदानाचा लाभ घ्यावा .यांनी विविध प्रकारच्या प्रक्रिया उद्योग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामधे त्यांनी करमाळा तालुक्यातील आत्तापर्यंत झालेले प्रकिया उद्योगाची माहिती दिली व या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचे जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे यांनी केले. याप्रसंगी संतोष गोसावी मंडळ अधिकारी यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली, तसेच आभार प्रदर्शन हरी दळवी यांनी केले.


