तपश्री प्रतिष्ठाणचा उपक्रम – पाच हजार नेत्रशस्त्रक्रियाचा टप्पा – २७ जूलैला शिबीर – जास्तीजास्त रुग्णांनी सहभागी व्हावे – श्रेणिकशेठ खाटेर

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा २१ : तपश्री प्रतिष्ठाण व पुणे येथील बुधराणी हॉस्पीटल यांच्या माध्यामातून सुरू असलेल्या नेत्र चित्कित्सा शिबीराच्या उपक्रमाने फार मोठी उंची गाठली आहे. आतापर्यंत त्यांनी २५ हजार व्यक्तींची नेत्रतपासणी केली असून ४८०० जणावर नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. लवकरच शस्त्रक्रियेचा टप्पा ५००० पर्यंत जाणार आहे. येत्या २७ जुलैला दत्तपेठेत नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित केले आहे. यावेळी जास्तीजास्त रुग्णांनी त्यात सहभागी व्हावे असे अवाहन तपश्री प्रतिष्ठाणचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते श्रेणीकशेठ खाटेर यांनी केले आहे.
सन २०१६ मध्ये तपश्री प्रतिष्ठाणने बुधराणी हॉस्पीटल यांच्या सहकार्याने नेत्रचिकित्सा शिबीर घेण्याची सुरवात केली. दरमहिन्याच्या २७ तारखेला हे शिबीर करमाळा शहरातील देवीच्या रस्त्यावरील बायपास चौकात आयोजित केले जाते.
करमाळा तालुक्यात अन्यत्र ठिकाणी अशी काही शिबीरे आयोजित केली जातात परंतू त्यात सातत्या नाही. आणखी विशेष बाब म्हणजे तपश्री प्रतिष्ठानव्दारे आयोजित शिबीरात पुणे येथील बुधराणी हॉस्पीटलची अधिकृत टीम येते, त्यात डॉक्टर असतात व तेच तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड करतात. निवडलेल्या रुग्णांना खास गाडीतून नेले जाते. पुणे येथे त्यांच्या १८ प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. त्यांना भारतीय लेन्स टाकून शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी नाममात्र ७०० रुपये चार्ज आकारला जातो. ज्यांना फेको पध्दतीने शस्त्रक्रिया करावयाची आहे किंव्हा जास्त किंमतीच्या लेन्स टाकावयाच्या असतील त्यांना थोडा जादा चार्ज पडतो. नेत्र रुग्णासाठी हा उपयुक्त उपक्रम आहे, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा …
– श्रेणिकशेठ खाटेर (अध्यक्ष-तपश्री प्रतिष्ठाण, करमाळा)


