ऊसाचे बिलासाठी करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेचा भरपावसात मोर्चा.. -

ऊसाचे बिलासाठी करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेचा भरपावसात मोर्चा..

0


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मकाई, कमलाई, घागरगाव साखर कारखान्यांनी उसाची बिले शेतकऱ्यांना मिळावीत म्हणून बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा आज भरपावसात काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा मोर्चा करमाळा येथील तहसील कचेरी येथे नेण्यात आला, याप्रसंगी याठिकाणी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी आपले विचार व्यक्त केले, ते म्हणाले कि, मकाई आणि कमलाई कारखान्यावरती आर आर सी प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्त यांनी तहसीलदारांना दिलेले आहेत, मात्र दोन महिने झाले तरी तहसीलदार हे साखर कारखान्यावर कारवाई करत नाहीत, म्हणून शेतकऱ्यांना बिले मिळत नाहीत, असे राजाभाऊ कदम यांनी याठिकाणी नमूद केले.

याप्रसंगी मोर्चेकर्‍यांचे निवेदन नायब तहसीलदार निकम यांनी स्वीकारले, यावेळी मकाई, कमलाई साखर कारखान्याचे प्रतिनिधी आले, परंतु मोर्चेकर्‍यांचे समाधान झाले नाही म्हणून तहसील कचेरी समोरून उठणार नाही, असा पवित्रा राजाभाऊ कदम यांनी घेतला आखेर नायब तहसीलदार निकम यांनी कमलाई मकाई कारखान्यांना कारवाईबाबतच्या नोटिसा काढलेल्या आहेत, असे लेखी पत्र दिले आहे.

मकाई कारखान्याने पंधरा दिवसात उसाची बिले काढणार असलेचे चेअरमनच्या सहीने लेखी पत्र दिले व कमलाई कारखान्याने तहसीलदार यांनी आमच्यावरती कारवाई करून साखरेचा निलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची व्यवस्था करावी अशा पद्धतीचे लेखी पत्र दिले तसेच जर पंधरा दिवसात पैसे मिळाले नाहीत तर साखर आयुक्ताच्या समोर धरणे आंदोलन करणार असाही निर्णय घेण्यात आला व शेतकऱ्यांच्यावतीने कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचाही निर्णय राजाभाऊ कदम यांनी शेतकऱ्याच्या सहमतीने घेतला.

यावेळी राष्ट्रवादीचे राजकुमार देशमुख, प्रहारचे संदीप तळेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अंगद देवकते, बौद्ध महासभेचे सुहास ओहोळ ,शाहीर शिवाजी कांबळे, श्रीकांत मार्कड यांची भाषणे झाली
याप्रसंगी दत्ता गव्हाणे लालासाहेब काळे, सुंदरदास काळे, संदीप मारकड, रवी घोडके, विष्णू रंधवे, अंगद लांडगे, आप्पा भोसले, रमेश भोसले, कालिदास कांबळे, मच्छिंद्र गायकवाड,आदी बहुसंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!