ज्येष्टांनी आनंददायी जीवन जगावे- बाळासाहेब गायकवाड

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.22: ज्येष्टांनी दैनदिन जीवनात कोणताही तणाव न घेता आनंददायी जीवन जगावे, असे अवाहन नायब तहसीलदार बाळासाहेब गायकवाड यांनी केले.
करमाळा तालुका सेवा निवृत्त संघ यांच्या वतीने ८५ वयापेक्षा जास्त असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान आयोजित केला होता. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडीत घाडगे गुरुजी हे होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. गायकवाड म्हणाले, की ज्येष्ट व्यक्तींनी संसारात न रमता आपले छंद जोपासावेत तसेच आपल्या मित्रांच्या संगतीत जास्तीजास्त वेळ व्यतीत करून आनंदात रहावे.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग दिक्षीत, उध्दव दुधे, किसन काळे, पांडुरंग पवार, गोविंद नेमाणे, विठ्ठल माळी, शिवाजी मोरे, विष्णू बिनवडे, ज्ञानदेव गायकवाड, आदिनाथ फुके, वसंत जोशी, मुरलीधर खरे व दत्तात्रय कानडे यांचा यावेळी पाहुण्याच्या हास्ते सन्मान केला.
यावेळी जलाल पठाण, सी.ना. मोरे यांची भाषणे झाली तर प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष भागवत घाडगे गुरुजी यांनी केले. सुत्रसंचलन संघटनेचे सचिव नारायण घोलप यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष हरीभाऊ फंड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी बापूराव जाधव, महादेव राऊत, परबत जाधव, सुधिर पंडीत यांनी प्रयत्न केले.