मराठा मंदिरकडून मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.. -

मराठा मंदिरकडून मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : मुंबई येथील मराठा मंदिर सार्वजनिक न्यास यांचे वतीने येथील मराठा महासंघाच्या चौघाजणांवर संगणमताने मराठा मंदिरची जागा मराठा महासंघाच्या नावे खोटी कागदपत्रे तयार करून केली असल्याचे नमूद करून करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाद्वारे पोलीसांनी यात गुन्हा दाखल केला आहे.

मराठा मंदिरचे प्रशासकीय अधिकारी बीपीन यशवंत मालगुंडकर यांनी सदरची खाजगी फिर्याद करमाळा न्यायालयात दिली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे, की करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व करमाळा न्यायालच्या मध्यभागी असलेली गट नं. २४३ ही जमीन मराठा मंदिर मुंबई या संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमसाठी आनंदराव शिंदे यांनी १० एप्रिल १९४७ ला बक्षीसपत्राने दिलेली होती.

तेव्हापासून सदरची मिळकत ही मराठा मंदिरच्या मालकी हक्काची व कब्जे वहिवाटीची असून बाजारात तिची किंमत कोट्यावधी रूपयाची आहे. असे असताना यात चौघांनी १९८८ साली महसुल अधिखाऱ्यांशी सगणपत करून सुप्रिडेंट अखिल भारतीय मराठश महासंघ शाख- सोलापूर अशी नोंद केली.

त्यानंतर पुढे या आरोपींनी आपण मालक आहोत हे दाखविण्यासाठी ११ जुन २०१३ ला अधिक्षक सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय सोलापूर यांकडे अखिल भारतीय मराठा महासंघ या बनावट संस्थेच्या विश्वस्त नोंदणीबाबत दिलेल्या अर्जामध्ये गट नं. २४३ ही मिळकत आरोपीच्या मालकीची आहे.

अशी खोटी व चुकीची माहिती देऊन गंभीर गुन्हा केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६/३ प्रमाणे पोलीसांकडे तपासाकामी पाठविले आहे. यानंतर पोलीसांनी मराठा महासंघाच्या चौघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!