सातोली गावात एसटी येताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत गाडीचे केले पूजन
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – करमाळा ते टेंभुर्णी ( केम वडशिवणे,सातोली,कंदर मार्गे) या एसटी गाडीची अनेक दिवसांपासून सातोली येथे मागणी होती.अखेर करमाळा आगाराने ही एसटी नुकतीच सुरू केली आहे. ही एसटी सातोली गावात येताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत गाडीचे पूजन करून वाहक व चालक यांचा सत्कार केला. ही एसटी सुरू व्हावी यासाठी सातोली येथील अमर साळुंखे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच आगार प्रमुख यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत एसटी अखेर सुरू झाली आहे.
सातोली गावात एसटी येत नव्हती. केमहून कंदर मार्गे टेंभुर्णी ला एकही एसटी येत नव्हती. त्यामुळे विद्यार्थी, व प्रवासी यांना यामुळे अडचणीना सामना करावा लागत होता. टेंभुर्णी ला जाण्यासाठी तास,न,तास खाजगी गाडीचा आसरा घ्यावा लागत होता. पुण्याहून तीन तासात प्रवासी टेंभुर्णी येथे येऊ शकतो पण केमला यायचे म्हटले तर चार ते पाच तास खाजगी गाडीसाठी वेळ बघावी लागत होती. आता या नवीन एसटी मुळे प्रवाशांची सोय झाली आहे तसेच विद्यार्थ्यांना कंदर, टेंभूर्णी, केम ला जाण्याची सोय झाली. वडशिवणे येथील प्रवाशांना विद्यार्थ्यांना केम टेंभूर्णी ला जाण्याची सोय झाली. नाही तर वडशिवणे येथील जेष्ट नागरिक महिला यांना केम येथे बाजार न्यायला यायचे असेल तर गाडी मिळत नव्हती, तेव्हा चालत येण्याची वेळ येत असे.
अमर साळुंखे व त्यांना सहकार्य करणारे गणेश गाडे, सचिन साळुंखे,भीमराव साळुंखे यांचे केम व वडशिवणे येथील ग्रामस्थांनी कौतुक केले. वडशिवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार,अतुल कामटे, पत्रकार संजय जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ वर्षां ताई चव्हाण यांनी आभार मानले.
केम, वडशिवणे, सातोली येथील, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व प्रवासी यांनी एसटी चालण्यासाठी सहकार्य करावे
अमर साळुंखे, सातोली