करमाळा शहरालगतचे सर्व नाले नगरपालिकेने साफ करून घ्यावेत – युवासेनेने दिले निवेदन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरालगतचे तिन्ही नाले नगरपालिकेने लवकरात लवकर साफ करून घ्यावे अशा प्रकारच्या विनंतीचे निवेदन युवा सेना जिल्हा सचिव आदेशराव बागल यांनी करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना २६ जुलै रोजी दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाच्या पाण्याने नाले तुंबून घाण वास पसरू शकतो. करमाळा शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून करमाळा बाजार समितीच्या पश्चिम बाजूला स्मशानभूमी जवळचा नाला, शहरातील आयडीबीआय बँकेच्या पूर्व भागातील नाला व निलज रोड वरील नाला (दुधे डॉक्टरांच्या समोरचा) हे सर्व नाले लवकरात लवकर साफ करावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी या निवेदनामध्ये दिला आहे.


