मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ करमाळ्यात महिला अत्याचार विरोधी समिती मार्फत आंदोलन.. - Saptahik Sandesh

मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ करमाळ्यात महिला अत्याचार विरोधी समिती मार्फत आंदोलन..

रमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : (ता.२८) : मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ करमाळा येथील तहसील कचेरीसमोर महिला अत्याचार विरोधी समिती मार्फत आज (ता.२८) आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना ॲड.सविता शिंदे म्हणाल्या की, मणिपूरमध्ये ३ महिन्यांपासून हिंसाचार चालू असून देखील देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री मणिपूरला भेट देत नाहीत की, संसदेत निवेदन देत नाहीत. महिला अत्याचाराच्या घटनेनंतर २ महिन्यानंतरही आरोपींवर कारवाई होत नाही. ही अतिशय निंदनीय व निषेधार्थ, माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे.

प्रा.रामदास झोळ झोळ म्हणाले की, अशा गुन्हेगारांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे. दशरथ कांबळे यांनी मणिपूरमध्ये संविधानाची व लोकशाहीची पायमल्ली होत असून महिला अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी योगेश शिंपी, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, मराठा सेवा संघाचे सचिन काळे, भीम आर्मीचे उत्तरेश्वर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष वारे, नलिनी जाधव, प्रा. गोवर्धन चौरे यांची भाषणे झाली. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पं. स. सभापती शेखर गाडे, पोलीस मित्र संघटनेचे विजया कर्णवर, माया कदम, राष्ट्रीय समाज पक्षाचे जीवन व प्रवीण होगले, अंगद देवकते, काँग्रेसचे प्रताप जगताप, गफूर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयमाला चौरे, शीतल क्षीरसागर, नदिनी लुंगारे, राजश्री कांबळे, आदिनाथ माने, सुहास पोळ, सहास ओहोळ, ॲड. अपर्णा पद्माले, ॲड. माया जाधव, ॲड. अमर शिंगाडे, अनिता चव्हाण, प्रभाकर शिंदे, युवराज जाधव, देविदास गायकवाड, भगवान डोंबळे, विष्णू वाघमोडे, अजित उपाध्ये, सोमनाथ जाधव, बाळासाहेब साळुंखे, मधुकर काळे, दिल्यावर शेख, सुजय जगताप, बाबा घोडके, नितीन चोपडे, सुनील गायकवाड, महेंद्र पाखरे इ. हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!