राणा दादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा.. हे व्रत उराशी बाळगून काम करणारे दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सामाजि सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामीचिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारच्या रोपट्याचे वृक्षारोपण करण्यात आले. बांधिलकीच्या भावनेतून कुरकुंभ ( ता. दौंड) येथील अविश्री बालसदन अनाथ आश्रमातील मुलांना पावसाळी रेनकोट, जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या समवेत केक कापून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर व संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अनाथ बालकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी श्रावणबाळ अनाथ आश्रम येथील मुलांना संगीत
साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून जीवनामध्ये काम करणाऱ्या राणदादा सुर्यवंशी यांनी वाढदिवसानिमित्त वृध्दांची तहान भागावी व त्यांना शुध्द पाणी मिळावे म्हणून वृध्दाश्रमाला २३० लिटरचा रेफ्रिजरेटर भेट देऊन फळांचे वाटप केले. तसेच इंदापूर येथील पिढीत महिला वर्करच्या मुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या बालविकास केंद्र येथे शिकत असलेल्या मुलांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून दत्तकला शिक्षण संस्थे तर्फे २५ लिटरचा वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. कऱ्हावागज (ता. बारामती) येथील निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी डॉ. सचिन बेरे, संदीप शहाणे, प्रा. जीवनकुमार सोडल, प्रा. प्रिती काळे, प्रा. विपुल त्रिवेदी, प्रा. स्नेहल जमदाडे, ज्योती झोरे, प्रा. पुजा बनसोडे, प्रा. रोहन जाधव, रियाज शेख, सोनाली बेलदार तसेच कर्मचारी उपस्थित होते.



