महसुल सप्ताहात सहभागी होऊन आपल्या समस्यांचा निपटरा करून घ्या- मंडल अधीकारी अमित कूमार कलेटवाड
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.2: १ ऑगस्ट हा दिवस राज्यभर “महसुल दिन” म्हणुन पाळण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. दरम्यान यावेळी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसुल प्रशासनाच्या वतीने “महसुल सप्ताह” राबविण्यात येणार आहे.ग्रामस्थांनी या १ ऑगस्ट पासुन सुरु होणाऱ्या या सप्ताहात सहभागी होऊन आपल्या समस्यांचा निपटरा करून घ्यावा असे अवाहन मंडल अधिकिरी अमित कूमार कलेटवाड यांनी केले आहे.
उपविभागीय अधिकारी करमाळा श्री समाधान घुटुकडे व तहसीलदार श्री विजयकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयोजन सालसे मंडळ महसूल विभाग यांच्या वतीने सालसे येथे आयोजीत करण्यात येत आहे.
या “महसुल सप्ताहा” मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा लाभ शेवटच्या ग्रामस्था पर्यंत पोहोचणे आपेक्षित आहे. यासाठी सालसे मी मंडळाधिकारी,तलाठी महालिंग बिराजदार, तलाठी परमेश्वर सलगर, तलाठी नवनाथ सस्ते सर्व कर्मचारी प्रयत्न करत आहोत.
यानुसार सालसे मंडळात ०२ व ०३ ऑगस्ट रोजी आधार कार्ड कॅप आयोजीत केलेे असून सालसे मंडळातील सालसे येथील शाळेमध्ये भेट देऊन मंडळ अधिकारी तर्फे या योजनेचा लाभ घेण्याचे अहवान करण्यात येत आहे.
३ ऑगस्ट – एक हात मदतीचा
४ ऑगस्ट – जनसंवाद
५ ऑगस्ट – सैनिक हो तुमच्या साठी
६ ऑगस्ट – महसुल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी संवाद
७ ऑगस्ट – महसुल सप्ताह सांगता समारंभ
तरी ग्रामस्थांनी लाभ घ्यावा,असेही मंडल अधिकारी श्री.कलेटवार यांनी केले.