करमाळा शहरातील गटार झाकण्याच्या कामात भ्रष्टाचार - ठेकेदारावर कारवाईची मागणी - Saptahik Sandesh

करमाळा शहरातील गटार झाकण्याच्या कामात भ्रष्टाचार – ठेकेदारावर कारवाईची मागणी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील वेगवेगळ्या चौकातील झालेले गटार झाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या कामात भ्रष्टाचार झाला असल्याची शहरभर चर्चा आहे.

करमाळा शहरात गटारी तुंबत असल्याने या गटारीवर लोखंडी बरॅक टाकण्यात आले आहेत, करमाळा शहरातील वेताळपेठ, दगडीरोड, फुलसौंदर चौक, मंगळवार पेठ, राशिनपेठ, कानाडगल्ली, वीर चौक, भवानी पेठ, मोहल्ला, फंड गल्ली आदी ठिकाणी गटारीवर लोखंडी बरॅक टाकून गटारी झाकण्याचे काम नुकतेच करण्यात आले आहे. सदर काम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लोखंडी बरॅक वाकले असून काँक्रीटकरणाचे काम अतिशय ठिसुळ झाले गटारीच्या आतील बाजूस काँक्रीटीकरणाचे धपले पडू आहेत.

या कामात गुणवत्ता नसल्याने या कामाची समिती नेमून या कामाची चौकशी करावी व झालेला भ्रष्टाचार उघड करून संबधीत ठेकेदारावार दंडात्मक कडक कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.

हे काम करत असताना आठ दिवसाच्या कामासाठी जवळपास दोन-दोन महिने काम रखडुन ठेवून नागरिकांना वेठीस धरले होते, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, तसेच या ठेकेदाराकडून अन्य होत असलेली कामे निकृष्ट दर्जाचे होत असलेली चर्चा सुरु आहे. अशा स्थितीत संबंधित ठेकेदाराची चौकशी करून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी शहरवासियांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!