केम येथे हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरामध्ये अधिक मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे वतीने सांगण्यात आली आहे. हा सप्ताह दि.७ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
या मध्ये सकाळी ८ वा श्रीस अभिषेक व ९ ते १२ भागवत कथा, दुपारी १२ ते २भोजन २ ते ५ भागवत कथा सायंकाळी ९ ते ११ कीर्तन व हरी जागर असे नित्यनेमाने धार्मिक कार्यक्रम होणार आहे.या भागवत कथेचे कथाकार ह.भ.प. रविद्रंजी महाराज परेराव, सोयगाव जि संभाजी नगर तर त्यांना साथ देणारे तबलावादक. ह.भ.प पुरूषोत्तम राउत, आॅर्गन वादक ह.भ.प भूषन महाराज गायनाचार्य ह.भ.प रघुनाथ महाराज पाटील राहुल महाराज शरद महाराज विशेष सहकार्य. महामुनी अगस्ती महाराज, वारकरी शिक्षण संस्था आमखेडा सोयगाव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.