दहावीत केम केंद्रात प्रथम आलेल्या श्रावणीला तिच्या क्लासकडून चक्क मोबाईल भेट
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केमच्या उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी श्रावणी वेदपाठक दहावीत ९६ टक्के गुण मिळवून केम केंद्रात पहिली आली. तिच्या या यशाबद्दल केम ग्रामस्थांच्या वतीने श्रावणीचा आई-वडिलांसमवेत सत्कार याआधी सत्कार करण्यात आला होता. नुकताच ब्रेन मॅपर्स कोचिंग क्लासेस च्या वतीने तिला मोबाईल देऊन सन्मानित करण्यात आले.
घरी असलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभ्यास करून यश तिने संपादित केले आहे. श्रावणीच्या घरची आर्थिक परिस्थिती व तिची हुशारी पाहून तिला आधार द्यावा या हेतूने केम येथील खाजगी क्लासेसच्या संचालिका सौ. नागटिळक मॅडम यांनी तिचा मोफत क्लास घेतला व मार्गदर्शन केले. श्री.नागटिळक यांच्या हस्ते तिला मोबाईल देऊन सन्मानित करण्यात आले.