मंगळवेढा येथील संत दामाजी अपंग सेवा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – दि.११ व १२ ऑगस्ट रोजी मंगळवेढा येथील संत दामाजी अपंग सेवा मंडळाच्या वतीने संस्थापक कै. काशिनाथ पाथरूड यांच्या जयंतीनिमित्त व संस्थेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक क्रीडा, चित्रकला व विविध मनोरंजनात्मक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेनंतर लगेच विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
संस्थेच्या प्रशासक समितीने शाळेची पाहणी केली असता श्री नागनाथ मतिमंद निवासी शाळेला आदर्श स्वच्छता समिती म्हणून पुरस्कार मिळाला. यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये या शाळेस जनरल चॅम्पियन शिप मिळाली. तसेच संस्थेच्या सर्व शाखामधून श्री अनिल माधव यादव यांना गुणवंत कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थी म्हणून प्रतीक संजय गोरे याचा गौरव करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे कला शिक्षक यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पाथरूट तसेच संस्थेचे सचिव श्री चित्रसेन पाथरूट, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पाथरूट व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हिरालाल नाळे यांनी कौतुक केले.