केडगावच्या तरुणांनी केली स्मशानभूमीत श्रमदानातून वृक्षलागवड…

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : केडगाव (ता.करमाळा) येथील तरूणांनी स्मशानभूमीची स्वच्छता करून, स्मशानभूमीत श्रमदानातून वक्षलागवड केली आहे.

स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आल्यानंतर बसण्यासाठी सावलीच उपलब्ध नसल्यामुळे लोकांची गैरसोय होत होती. अशा दुर्लक्षित व्यवस्था करण्यासाठी फारच उदासीनता आढळून येते परंतु केडगाव येथील तुकारामनगर तरूण मंडळातील तरुणांनी एकत्र येऊन स्मशानभूमीत ठिकाणी स्वच्छता करत वृक्ष लागवड करून या झाडांसाठी पाण्याचीही व्यवस्था केली आहे.

या ठिकाणी चिंच ,करंजा, चेरी ,वटवृक्ष ,सप्तपर्णी ,रेनट्री ,बॉटल फोम इत्यादी वीस मोठ्या वीस वृक्षांची रोपे हायटेक नर्सरी अकोले खुर्द येथून आणून झाडांकरीता स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था करून यासाठी ठीबक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेले आहे त्याकरिता बारा हजार रुपये खर्च सर्वांनी एकत्रित करून श्रमदानातून वृक्ष लागवड केली यावेळी शिवाजी पांडुरंग बोराडे ,एकनाथ लगस, भैरवनाथ शिनगारे ,समाधान शिनगारे ,मिलिंद बोराडे, बापू खोलासे ,परमेश्वर शिंदे, शंकर वैद्य ,नितीन लगस ,पांडुरंग फरतडे ,राजेंद्र वैद्य व रवी लोकरे यांनी श्रमदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!