वाशिंबे रेल्वे बोगदा ते भैरवनाथ मंदिर पाणंद रस्ता मंजुर
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील वाशिंबे रेल्वे बोगदा ते वाशिंबे येथील भैरवनाथ मंदिर हा पाणंद रस्ता मंजूर झाला असल्याची माहिती प्रा.रामदास झोळ यांनी दिली.
वाशिंबे रेल्वे बोगदा ते वाशिंबे येथील भैरवनाथ मंदिर येथे पाणंद रस्ता नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता ही बाब प्रा. रामदास झोळ यांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्फत रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता.
मंत्री भुमरे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ते सहमती योजनेतून हा पाणंद रस्ता मंजूर करून घेतला.
त्यामुळे वाशिबे रेल्वे बोगदा पूल ते भैरवनाथ मंदिर पाणंद रस्त्यांच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. ही बाब समजताच वाशिंबे ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी प्रा. रामदास झोळ व शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचे आभार मानले.