नेरले येथील हिराबाई पन्हाळकर यांचे निधन -

नेरले येथील हिराबाई पन्हाळकर यांचे निधन

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – नेरले (ता.करमाळा) येथील हिराबाई सुबराव पन्हाळकर यांचे आज (दि.२४) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ७५ होते.

त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी त्यांचा शोकाकुल वातावरणात पन्हाळकर वस्ती नेरले येथे अंत्यविधी झाला. त्यांच्या अंत्यविधीला गावातील ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  ३२ वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मोठ्या कष्टाने तीन मुलांचे संगोपन करत संसार चालविला. नेरले ग्रामपंचायत सदस्य शहाजी पन्हाळकर यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!