कन्याकुमारी-पुणे एक्स्प्रेसचे केम येथे जल्लोषात स्वागत – गाडी चालकांचा केला सत्कार

0

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम रेल्वेस्थानकावर कन्याकुमारी-पुणे या एक्स्प्रेस ( गाडी क्रमांक 16382) गाडीला नुकताच रेल्वे विभागाकडून थांबा मंजूर करण्यात आला असून केम स्टेशनवर आज (दि.२६) कन्याकुमारी-पुणे गाडी प्रथमच आल्यानंतर या गाडीचे स्थानिकांनी जोरदार स्वागत केले. या गाडीचे चालक व्यंकटेश राव व मनोजकुमार यांचा सत्कार प्रवासी संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला.

मध्य रेल्वेच्या, जेऊर, केम, माढा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे याचे अधिकृत पत्र रेल्वे विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. जेऊर येथे कोणार्क एक्स्प्रेस तर केम येथे कन्याकुमारी-पुणे, माढा येथे मुंबई-सोलापूर सिध्देश्वर एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळालेला आहे. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. केमसाठी यावर्षी हैदराबाद-मुंबई व मुंबई पंढरपूर या गाड्यांनाही नव्याने थांबा मिळालेला आहे. त्यानंतर आता कन्याकुमारी पुणे या गाडीला थांबा देण्यात आला आहे त्यामुळे केम परिसरातील नागरिकांची, विद्यार्थ्यांची, नोकरदारांची चांगली सोय होत आहे.

या वेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय ओहोळ, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, युवासेनेचे सागर राजे तळेकर, धनंजय ताकमोगे, सचिन श्रृंगारे, बाळू भोसले, दादा अवताडे, पठाण, सूरज आदीजन उपस्थित होते.

सोलापूरला जायची अडचण संपली नाही – कन्याकुमारी-पुणे एक्स्प्रेस गाडीला जाताना थांबा दिला आहे परंतु अजून येताना पुणे-कन्याकुमारी गाडीला थांबा मिळाला नाही. तसेच सोलापूर ला जाण्यासाठी सकाळी कोणतीच गाडी नाही. त्यामुळे दि.२७ रोजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे केम येथे कन्याकुमारी पुणे या गाडीला झेंडा दाखवण्यासाठी येणार आहेत त्या वेळेस प्रवासी संघटनेचे वतीने मुंबई चेन्नई एक्सप्रेस ला थांबा मिळावा या साठी निवेदन देण्यात येणार आहे.

विजय ओहोळ , अध्यक्ष, केम प्रवासी संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!