सौ.रोकडे यांचा अन्य महिलांपुढे मोठा आदर्श – आमदार संजयमामा शिंदे
करमाळा,ता.२७ : नोकरी, संसार करत मुलगा व परिवारासोबत राहून एम.पी.एस.सी. मध्ये राज्यात महिलेत प्रथम येणे हा एक मोठा आदर्श सौ. सुप्रियाताई रोकडे यांनी अन्य महिलांपुढे ठेवला आहे, असे मत करमाळा मतदार संघातील आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले
वांगी नं.३ (ता.करमाळा) येथील सौ.सुप्रिया श्रीकांत रोकडे यांची “औद्योगिक सुरक्षा व आरोग्य” या विभागात उपसंचालक – श्रेणी १ या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यामध्ये महिलांत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विविध विकासकामांचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुभाष सुराणा हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. डॉ. बाबूराव हिरडे, माजी प्राचार्य यशवंतराव लावंड, खरेदीविक्री संघाचे चेअरमन शभुराजे जगताप,लव्हे गावचे सरपंच विलासदादा पाटील, जि.प. चे मा. उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, ॲड.सविताताई शिंदे, मा.नितीन खटके, आदिनाथचे कारखान्याचे संचालक पांडूरंग आबा जाधव, मार्केट कमिटीचे चेअरमन शिवाजीराव बंडगर, माजी जि.प.सदस्य बंडूनाना ढवळे, पत्रकार धनंजय मोरे आदीजन उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. शिंदे म्हणाले की, फक्त विद्यार्थीनी म्हणून यश मिळवणं सोपं असतं पण नोकरी व संसार सांभाळून यश मिळवणे कठीण असते. अनेक महिला लग्न झाल्यावर व नोकरी लागल्यावर परीक्षेचा नाद सोडून देतात पण सुप्रियाताईने हे सर्व असूनही जे यश मिळवले ते देदीप्यमान आहे. त्यांनी एवढ्याच यशावर न थांबता पुढचा युपीएसीचा पल्ला गाठावा, असे आवाहन केले.
यावेळी डॉ. सुभाष सुराणा, श्री. जगताप, डॉ. हिरडे, प्राचार्य लावंड गणेश पवार यांची भाषणे झाली. तर प्रास्ताविक श्री. रोकडे यांनी केले. यावेळी तात्यामामा सरडे,उदय भैय्या देशमुख,रोहिदास सातव,अशोक तकीक,संतोष देशमुख,बेरे सरपंच, धनंजय गायकवाड, दिनकर रोकडे, प्रा.शहाजीराव देशमुख ,लक्ष्मण महाडिक, अर्जून आबा तकिक,बापूराव देशमुख,भारत बाबा रोकडे, सुहासनाना रोकडे,सोमनाथ रोकडे, सरपंच मयुर रोकडे, उपसरपंच संतोष कांबळे,युवराज रोकडे,रवि रोकडे,अॅड.सुनिल रोकडे तसेच ग्रामपंचायत सदस्य, रोकडे कुटूंबीयप, महिला भगिनी, तरुण मित्र व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन तकिक आणि दिपक कारंडे यांनी केले तर आभार भारत रोकडे यांनी मानले .