तालुकास्तरीय क्रीडा सामन्यांचे आयोजन करणाऱ्या शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल – शिक्षक भारती संघटना तालुकाध्यक्ष विजयकुमार गुंड
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – तालुकास्तरीय क्रीडा सामन्यांचे आयोजन करणाऱ्यांना शाळांना सोलापूर येथील क्रीडा अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारे अनुदान मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असेल असे आश्वासन करमाळा शिक्षक भारती संघटनेचे तालुकाअध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी दि.२९ ऑगस्ट रोजी वीट(ता.करमाळा) येथे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात व्यक्त केले.
तालुकास्तरीय खो-खो सामन्याच्या वेळी करमाळा तालुक्याचे शिक्षक भारतीचे नूतन अध्यक्ष श्री. विजयकुमार गुंड यांनी भेट दिली. विजयकुमार गुंड यांची नुकतीच करमाळा शिक्षक भारती संघटनेच्या करमाळा तालुक्याध्यक्ष पदी निवड करण्यात झाली आहे. या निमित्ताने त्यांचा सत्कार वीट येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी श्री. निवृत्ती बांडे, शिक्षक भारती संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री. किशोर जाधवर, तसेच शिक्षक भारतीचे तालुका कोषाध्यक्ष श्री. गोरख ढेरे उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कोळेकर यांनी गुंड सर यांचे स्वागत केले व प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी विद्यालयाचे सहशिक्षक तसेच तालुका गणित अध्यापक मंडळाचे श्री. आजबे, प्रशालेचे क्रीडा प्रशिक्षक श्री. विनोद ढेरे, करमाळा तालुका कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री. सोमनाथ राऊत उपस्थित होते.