तालुकास्तरीय स्पर्धेत विविध प्रकारात केममधील विद्यार्थ्यांचे सुयश
केम (संजय जाधव) – केम मधील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आश्रम शाळा व स्वराज्य मैदानी खेळ अकॅडमी यामधील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत सुयश संपादन केले असून या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यात 19 वर्ष वयोगटात कुमार शिवानंद राजकुमार तळेकर 400 मीटर धावणे या क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक, 19 वर्ष वयोगटात कुमारी रूपाली शामराव कांबळे भालाफेक या क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. 17 वर्ष वयोगटात कुमारी अमृता सुभाष पळसकर हातोडा फेक या क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. 17 वर्ष वयोगटात कुमारी सानिका दत्तात्रेय मोरे भालाफेक या क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला तर आश्रम शाळेचा विद्यार्थी कुमार सार्थक कालीदास पवार लांब उडीत प्रथम क्रमांक मिळवून त्याची जिल्हा स्तरीय लांब उडी स्पर्धेसाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक दादा अवताडे ,किरण परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले या यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष सुदर्शन तळेकर मुख्याध्यापक श्रीमती ताकमोगे , मुख्याध्यापक बिचितकर व्हि,ए व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
स्वराज्य मैदानी खेळ अकॅडमी मधील सौरभ मोरे (14 वर्षे वयोगट) थाळी फेक मध्ये (19.4 मीटर) तालुक्यात दुसरा क्रमांक आलेला आहे. प्रिया चेंडगे (17 वर्षे वयोगट) हातोडा फेक (14.50मी.) प्रथम क्रमांक व थाळी फेक (22.35 मी) मध्ये दुसरा क्रमांक, सिद्धी तळेकर 17 वर्षे वयोगट भाला फेक (21.40 मीटर) मध्ये प्रथम क्रमांक व थाळी फेक (22.40 मी.)- प्रथम क्रमांक मिळाला आहे. अमृता पळसकर 17 वर्षे वयोगट हतोडा फेक (13.28 मीटर)दुसरा क्रमांक तर सानिका मोरे 17 वर्षे वयोगट भाला फेक (18.30 मीटर) – दुसरा क्रमांक मिळविला आहे.
या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक आणि स्वराज्य स्पोर्ट अकॅडमी चे अध्यक्ष अक्षय दत्तात्रय तळेकर यांनी मार्गदर्शन केले.