बिटरगाव (वांगी) ग्रामस्थांतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच राजकीय क्षेत्रातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच राजकीय क्षेत्रातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार बिटरगाव वांगी (ता.करमाळा) येथील महेंद्रभैया पाटील यांचे ‘कृष्णकुंज‘ या निवासस्थानी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला होता.

बिटरगाव येथील शिवाजी राखुंडे व कुलदीप पाटील यांची करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी बिनविरोध निवड, मोहन गायकवाड गुरुजी यांना आचार्य दादासाहेब दोंदे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच कु.गौरी अण्णासाहेब निंबाळकर ई. ९वी हिला वसंत महोत्सव वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच कु. साक्षी कुमार आरकीले ई. ८ वी महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धेत गोळा फेक मध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल (दोन्ही विद्यार्थिनी डॉ.लहू श्रीपती कदम विद्यालय वांगी नं.१ या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत).

तसेच प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांचा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाच वर्ष उत्कृष्ट कारभार केल्याबद्दल व अर्जुन तकीक यांची महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल गुणगौरव आणि सत्कार करण्यात आला होता.

याप्रसंगी कुमारी गौरी निंबाळकर हिने शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणारे उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त केले . त्यानंतर शिवाजी राखुंडे व कुलदीप पाटील यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग शेतकऱ्यांचे प्रश्न मार्केट कमिटीच्या संदर्भात मार्केट कमिटीच्या माध्यमातून सोडवून मार्केट कमिटीच्या प्रगतीस हातभार लावण्याचा मनोदय व्यक्त केला. आदर्श शिक्षक श्री गायकवाड गुरुजी यांनी त्यांनी विविध गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अनुभव आणि विद्यार्थी व पालकांचा समन्वय कसा साधावा ? याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कु.साक्षी आरकीले हिला गोळा फेक या क्रीडा प्रकारामध्ये दिलेले प्रशिक्षण आणि आलेल्या अडचणी याविषयी आपले अनुभव महादेव भारती गुरुजी यांनी कथन केले. तर अर्जुन आबा तकिक यांनी केळी पीका संदर्भात व्यापारी, केळी निर्यात संधी व केळी पिकास उत्पादन खर्चाच्या मानाने मिळणाऱ्या दरामध्ये सातत्य नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच केळी निर्यात होणाऱ्या परकीय राष्ट्रांचे चलन व भारतीय रुपया यामध्ये असणाऱ्या तफावतीनुसार योग्य भाव मिळत नसल्याची बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक महेंद्रभैय्या पाटील यांनी शेलगाव वांगी येथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्याची आवश्यकता पटवून दिली तर प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांनी आपले अभ्यासपूर्ण मनोगतात जेऊर येथे मार्केट कमिटीच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज निर्माण करून केळी वाहतुकीसाठी रेल्वेच्या बोगी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी बिटरगाव वांगी भिवरवाडी ढोकरी परिसरातील प्रा. शिवाजीराव बंडगर ,दत्ताबापू देशमुख, बिभीषण देशमुख , विठ्ठल शेळके ,गणेश तळेकर,विकास पाटील,अर्जुन आबा तकीक, महादेव डुबल,काकासाहेब निंबाळकर,आबासाहेब नलवडे उपसरपंच बिटरगाव,शंकर सरडे ग्रा.प .सदस्य बिटरगांव, दादासाहेब भोसले,नागेश बोरकर,अमरसिंह आरकीले,पोपट मंगवडे, ज्ञानेश्वर धनवे,हनुमंत धनवे, कांतीलाल सरडे,नागनाथ राखुंडे,रणजित पाटील,दादासाहेब सरडे,भाऊसाहेब नलवडे,विठ्ठल सरडे,सचिन भोसले,समाधान रोडगे,माऊली पाटील,ज्ञानेश्वर मंगवडे, हनुमंत राखुंडे, शांतीलाल जानभरे, बळनाथ धनवे,पांडुरंग कोरे,अतुल कुलकर्णी,ज्ञानेश्वर नलवडे , गणेश जाधव,नाना सरडे,जोतिराम सरडे,दत्ता सरडे ईत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुनआबा तकीक यांनी केले तर आभार प्रदर्शन संदेश काका पाटील यांनी केले.