दहिगाव उपसासिंचनचे पाणी नियोजन करताना शासकीय – कामकाजात अडथळा

करमाळा / संदेश प्रतिनधी
करमाळा : दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी घोटी पर्यंत जाण्यासाठी मधल्या चारीवरील पाणी उपसा बंद ठेवण्यासाठी विद्युतपंपाच्या फ्युजा काढून ठेवल्या असता, एकाने संबंधित अधिकाऱ्यांना दमबाजी करून गाडीतील फ्युजा काढून फेकून देऊन शासकीय कामकाजात अडथळा आणला आहे.
या प्रकरणी कुकडी कालवा डावा उपविभागाचे अधिकारी संजय काशिनाथ आवताडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी घोटी भागात जाण्यासाठी वरील चारीवरील लोकांना मोटर बंद करा.. हे सांगत होतो. त्या मोटरी चालू होऊ नये म्हणून त्यावरील फ्युजा काढत होतो. त्यावेळी खडकेवाडी येथील प्रविण छगन शेळके हा गाडीला अडवा आला व तुमची गाडी जावू देणार नाही असे म्हणून गाडीतील फ्युजा काढून फेकून दिल्या व शासकीय कामकाजात अडथळा आणला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


