केम ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी दुरंगी लढत
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. यात केम ग्रामपंचायतीचा देखील समावेश आहे. केम ग्रामपंचायत ही तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
केम ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या ग्रामपंचायत निवडणुकीत एकास-एक, उमेदवार रिंगणात आहेत एकूण १७ सदस्य जागेसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण मतदार संख्या सुमारे ७४११ आहे.यावेळेस सरपंच पद हे जनतेतून निवडले जाणार असून सरपंचपद हे महिला ओ.बी.सी. साठी राखीव आहे. श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनेलकडून मनीषा बाळासाहेब देवकर व सत्ताधारी अजितदादा तळेकर गटाकडून सारिका राहुल कोरे यांच्यात सरपंच पदासाठी दुरंगी लढत होणार आहे.
केम ग्रामपंचायत मध्ये मोहिते-पाटील गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते अजितदादा तळेकर यांची एक हाती सत्ता १५ वर्ष राहिली आहे. या सत्तेला आव्हान देण्यासाठी बागल गट शिंदे, जगताप व प्रहार संघटना या गटातील तरुणांनी एकत्र येऊन श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनल तयार करून कडवे आव्हान दिले आहे त्यामुळे आता जनता नेमकी काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- दोन्ही पॅनलचे उमेदवार प्रभाग निहाय पुढीलप्रमाणे
- शिवशंभो पॅनेल
- प्रभाग क्रमांक १
- १) प्रकाश तळेकर
- २) भाग्यश्री गाडे
- ३) सारिका पवार
- प्रभाग क्रमांक २
- १) प्रविण कोरे
- २) अशोक केंगार
- ३)इंदूमती दौड
- प्रभाग क्रमांक ३
- १) हिराबाई शिंदे
- २)आजीनाथ देवकर
- प्रभाग क्रमांक ४
- १) अजितदादा तळेकर
- २)संगिता तळेकर
- ३) अनुराधा भोसले
- प्रभाग क्रमांक ५
- १) नागनाथ तळेकर
- २) नामदेव तळेकर
- ३) पुष्पा शिंदे
- प्रभाग क्रमांक ६
- १) ज्ञानेश्वर बिचितकर
- २)सौ अश्विनी देवकर
- ३) सविता अवघडे
- श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनेल
- प्रभाग क्रमांक १
- १)गोरख पारखे
- २) वंदना तळेकर
- ३) ऋतुजा ओहोळ
- प्रभाग क्रमांक २
- १)सागर कुरडे
- २) विजयसिंह ओहोळ
- ३)अलका गोडसे
- प्रभाग क्रमांक ३
- १)अनिता वायभासे
- २)अमोल देवकर
- प्रभाग क्रमांक ४
- १) संदिप तळेकर
- २)सौ पद्मिनी तळेकर
- ३)छाया ओहोळ
- प्रभाग क्रमांक ५
- १)सागर तळेकर
- २) संदिप तळेकर
- ३) उज्वला तळेकर
- प्रभाग क्रमांक ६
- अन्वर मुलाणी
- सौ कमल अवघडे
- दत्तात्रय बिचितकर
या निवडणूकीत सरपंच पदाबरोबर प्रभाग क्र. ४ कडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या प्रभागामध्ये सत्ताधारी गटाचे नेते व मोहिते पाटील गटाचे निष्ठावंत अजितदादा तळेकर हे निवडणुकीस उभे आहेत तर त्यांच्या विरोधात श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनेलकडून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर हे प्रथमच या निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेने एकही उमेदवार दिला नसून सध्या तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तरी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अजून चित्र स्पष्ट होईल.