पोथरे येथील ‘भैरवनाथ’ मंदिरातील पहिल्या टप्प्याच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोथरे (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील पहिल्या टप्प्यातील जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले आहे. यात मंदिरातील फरशीसह सुशोभिकरणाचे काम करण्यात आले. लोकवर्गणीतून हे काम करण्यात आले असून, त्यासाठी गावातील भाविकांनी १ लाख २८ हजार ५८५ रूपये देणगी दिली आहे. त्यापैकी १ लाख २६ हजार ८१५ रूपये खर्च झाले आहेत.
देणगी बरोबरच भाविकांनी ट्रॅक्टर, पाणी व्यवस्था, वस्तुंचे सहकार्यासह श्रमदानही केले आहे. या जीर्णोध्दाराचे कार्य हनुमान भजनी मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले. यासाठी ज्या भाविकांनी देणगी दिली त्यांचा विजयादशमी दिवशी नुकताच टोपी, उपरणे व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे.

या मंदिराच्या श्रमदानासाठी गंगाधर शिंदे, नाना महाराज पठाडे, ज्ञानदेव नायकोडे (माजी सरपंच), विलास महाराज शिंदे, आबासाहेब भांड, पमराज शिंदे, चंद्रकांत शिंदे, शांतीलाल झिंजाडे, गेणदेव ठोंबरे, शिवाजीराव झिंजाडे, माऊली झिंजाडे, गोपीनाथ शिंदे, मुकूंद जाधव, मारूती लाडाणे, दादा झिंजाडे, भीमराव जाधव, गणेश जाधव, बहाद्दूर आढाव, आजिनाथ महाराज कडू, बाबुराव झिंजाडे, कल्याण जाधव, दत्ता महाराज नंदरगे, दादा ढावरे, दत्तू सावंत, माऊली पुराणे यांनी केले.

ट्रॅक्टर व पाणी सहकार्य सोपानकाका शिंदे, सुभेदार झिंजाडे, अमोल साळुंके, नितीन साळुंके, तुकाराम नायकोडे, पाराजी शिंदे यांनी केले. वस्तुरूपी देणगी आबा चव्हाण, महादेव झिंजाडे, नवनाथ श्रीरंग शिंदे, सतीश आमटे यांनी केले. तर अष्टविनायक गणेश मंडळ शिनथडी यांनी ३,३३३ रू. तर छत्रपती गणेश मंडळ चव्हाण वस्ती यांनी २१०० रू. दिले आहे. कै. सुखदेव सखाराम झिंजाडे यांचे स्मरणार्थ ५ हजाराचे टाळ तर कै. रामभाऊ शिंदे यांचे स्मरणार्थ ५ हजाराचे टाळ देण्यात आले आहे.
